केळी विक्री करून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धित पदार्थ करून जर विक्री केली तर अधिक नफा कमवू शकतो ही गोष्ट येथील महिलांना पटलेली आहे.
May 10, 2022
उन्हाळी भुईमूग समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिकांवर “शेती दिन” साजरा
June 7, 2022

समतोल आहाराचे महत्त्व…..

मुलांची शारीरिक वाढ व बौद्धिक विकास यांचा संबंध सरळ आहाराशी असतो. तसेच कमी वयात लागलेल्या आहाराच्या सवयी व आवडीनिवडी नेहेमी साठी राहतात. म्हणूनच त्यांच्या आहाराचे नियोजन करणे आवश्यक आहे. पोषणमूल्यांच्या अभावामुळे शाळेतील मुलांना बऱ्याच आजारांना तोंड द्यावे लागते व याचा परिणाम त्यांच्या भावी आयुष्यावर पडतो. शाळकरी मुलांना योग्य पद्धतीने आहाराचे महत्त्व समजून सांगितल्यास त्याचा चांगला परिणाम त्यांच्या रोजच्या खाण्याच्या सवयी वर झालेला आढळतो.

याच उद्देशाने दिनांक 4 मे 2022 रोजी सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ आयोजित समर कॅम्प मध्ये डॉ. माधुरी रेवणवार यांनी मुलांना “समतोल आहाराचे महत्त्व” बौद्धिक खेळ, व्हिडिओ आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे समजाऊन सांगितले. या प्रसंगी समर कॅम्प मध्ये सहभागी 105 विद्यार्थि उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर खेळामध्ये नंबर आलेल्या 9 विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून छोटे बक्षीस देखील देण्यात आले. 

#children #diet #plan #summercamp2022 #SummerCamp #balance_diet #kvk #sagroli #nanded #swimming #horseriding #Adventure #education #rural #selfcare #homely #training #cultural #activities #physical_fitness #physical #physicalhealth #physicalfitness #physical_growth #IntellectualDevelopment

Comments are closed.