संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी ता. बिलोली जि. नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान खरीप 2022 अंतर्गत काठेवाडी ता. देगलूर येथील 20 हेक्टर क्षेत्रावर समूह प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक सोयाबीनसाठी 50 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या प्रात्यक्षिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे ज्यात प्रामुख्याने सुधारित वाण वापर केडीएस 726 फुले संगम, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन ,बीबीएफ तंत्राने किंवा टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड ,ट्रायकोडर्मा व एनपीके ची बीजप्रक्रिया ,एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे,5% निंबोळी अर्काचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेट 2 चा वापर इत्यादी तंत्रज्ञान राबवण्यात येणार आहे व त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी वरील निविष्ठा व तंत्रज्ञानाचा अवलंब कशा पद्धतीने करावा याविषयी प्रशिक्षित केले. या कार्यक्रमासाठी प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या काठेवाडी गावातील 50 शेतकऱ्यांची उपस्थिती होती.