राष्ट्रीय तेलबिया पिके अभियान 2022 -23 अंतर्गत संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी कडून समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके उन्हाळी भुईमूग (20 हेक्टर ,50 शेतकरी) सगरोळी तालुका बिलोली गावातील 50 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. हे पीक प्रात्यक्षिक केहाळ तालुका जिंतूर येथील प्रगतिशील शेतकरी कृषीभूषण श्री मधुकरराव घुगे यांनी विकसित केलेल्या ” भुईमूग लागवडीचा घुगे पॅटर्न” वर आधारित आहे. उन्हाळी भुईमूग लागवडीचा घुगे पॅटर्न शेतकऱ्यांना पेरणी पूर्व प्रशिक्षणातून शिकवण्यात आला व प्रयोगांतर्गत उन्हाळी भुईमुगाचे वाण टॅग 37 व बीज प्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा ,एनपीके व जमीन आरोग्य पत्रिका इत्यादी निविष्ठा देण्यात आल्या. या प्रात्यक्षिका अंतर्गत घुगे पॅटर्नचा अवलंब करून प्रति एकरी 15 ते 20 क्विंटल उन्हाळी भुईमूग उत्पादनाचे लक्ष निर्धारित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात संस्कृति संवर्धन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री रोहित देशमुख व कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच उपस्थित शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांनी श्री मधुकर घुगे यांच्या उन्हाळी भुईमूग लागवडीच्या प्रक्षेत्र भेटीचे अनुभव कथन केले. #farming #agriculture #हवामान_अंदाज #kvksagroli #krushived #climatechange #climatefriendly #हवामान_अंदाज #farmingpractices