जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे
January 13, 2022
पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचा हात धरल्यास यश नक्की मिळतं- श्री.ज्ञानेश्वर बोडखे
January 13, 2022

सावित्रीच्या लेकींचा सत्कार…..

सावित्रीच्या लेकींचा सत्कार. आज दि. 3 जानेवारी 2022, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संस्कृती संवर्धन मंडळ संचलित, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिसरातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ. सुनंदाताई देशमुख यांचा परिसरातील महिलांच्या संघटन कार्याबद्दल तसेच ज्ञानदानाच्या कार्याबद्दल सौ. चंदना कळकेकर, सौ. बबीता कंदूरके, सौ. तारा सिद्धापुरे, सौ. तारा ठाकूर, सौ. प्रणिता कुलकर्णी व सौ. छबुताई बोडके या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर गीतही सादर केले गेले. #SavitribaiPhule #maharashtra #SavitribaiPhuleJayanti #education
 
 

Comments are closed.