सोयाबीन कापणी सोपी करण्यासाठी सोयाबीन कापणी हातमोजेचा प्रभावी वापर….
सोयाबीन कापताना महिलांच्या हाताला वाळलेल्या सोयाबीन टोचुन त्रास होतो. दिवसा अखेरीस हाताची आग होते आणि घरातील नियमित कामे करताना त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी सोयाबीन कापणी हात मोजे अतिशय उपयुक्त आहेत. हे हात मोजे वापरून सोयाबीन कापताना होणारा त्रास पूर्णपणे कमी होतो, हात सुरक्षित राहतात आणि वेळेची बचत होते. सध्या सोयाबीन कापणी सुरू आहे. म्हणूनच महिला किसान दिनाचे औचित्य साधून संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि रिलायन्स फाउंडेशन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने डोनगाव खु. तालुका बिलोली येथे दि. 14/10/2022 रोजी महिलांना सोयाबीन कापणी हात मोजांची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. महिलांनी हे मोजे वापरून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
#women #farmers #soyabean #rural #agricultural #FarmingChallenge