स्वच्छ्ता माह कार्यक्रमाचे औचित्य साधून काटकळंब येथे “स्वच्छ दूध उत्पादन” या विषयावर माहिती सांगण्यात आली. तसेच अस्वच्छतेमुळे दुधाळ जनावरांना होणाऱ्या दगडी (mastitis) या रोगाविषयी माहिती सांगितली. दगडी रोग लवकर निदर्शनास आला तर उपचार लवकर सुरू करता येतात आणि दुधाळ जनावरे यापासून वाचवता येतात. याच अनुषंगाने CMT (Californian Mastitis Test) चे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. शेतकऱ्यांनी स्वतः टेस्ट करून पाहिले आणि टेस्ट मधून मिळणारे निष्कर्ष स्वतः तपासून पाहिले. यानंतर प्रथम दर्शनी प्रात्यक्षिक मध्ये निवड केलेल्या व्यक्तींना CMT Kit निविष्ठा म्हणून देण्यात आल्या. तसेच ग्रामप्रिया पक्षांची चाचपणी करण्यासाठी ची प्रथम दर्शनी प्रात्यक्षिक साठी निवड केलेल्या महिला शेतकऱ्यांना 1 महिन्याची कुक्कुटपिल्ले देण्यात आली. #KrishiVigyanKendra #kvksagroli #cow #farmers #animal #animallovers #care #animals #buffalo #milk_animal #स्वच्छ्ता #दूधउत्पादक #mastitis #जनावरे