संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि नांदेड कडून राष्ट्रीय तेलबिया पिके अभियानांतर्गत उन्हाळी भुईमूग समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके मौजे अंबुलगा तालुका मुखेड येथे उन्हाळी हंगामात 10 हेक्टर 25 शेतकऱ्यांकडे लागवडीचा “घुगे पॅटर्नचा” अवलंब करून प्रात्यक्षिक घेण्यात आले होते.सध्या प्रत्यक्ष पिकाची काढणी चालू आहे शेतकऱ्यांना सरासरी 12 ते 15 क्विंटल प्रति एकरी उत्पादकता मिळत आहे, जे की सरासरी उत्पादकता पेक्षा अधिक आहेत. या शेती दिन कार्यक्रमात प्रात्यक्षिकातिल शेतकरी श्री दिगंबर कदम यांनी “घुगे पॅटर्न” चे स्व अनुभव कथन केले . कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे व सहकारी श्री तुकाराम मंत्री यांनी शेतकऱ्यांना परंपरागत लागवड पद्धत व घुगे पॅटर्न यातील बदलाविषयी जागृत केले व याचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्याचे आव्हान केले. या शेती दिन कार्यक्रमासाठी परिसरातील शेतकरी व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला