“किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” अभियानांतर्गत शेतकरी मेळावा…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” अभियानांतर्गत संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड कडून मौजे होट्टल तालुका देगलूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मच्छिंद्र मुंडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ती हरबल बायोटेक लिमिटेड पुणे ) यांनी औषधी वनस्पती करार शेती अंतर्गत अश्वगंधा, चिया, सोना मोती व काळा गहू इ. पिकाच्या करार शेती विषयी शेतकऱ्यांना अवगत केले. तसेच दुसरे मार्गदर्शक श्री विजय कुलकर्णी यांनी मोहगणी करार शेती करून कार्बन क्रेडिट कसे मिळवता येईल व परंपरागत शेतीसोबत वन शेतीची जोड दिल्यास शेतकरी अधिक नफा व निसर्गाचे संवर्धन करू शकतील असे मत मांडले. बँकेचे प्रतिनिधी श्री संगेवार यांनी वैयक्तिक शेतकऱ्यांना, शेतकरी गटांना व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळणाऱ्या विविध बँक कर्जाविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी विशेषतः जिल्ह्यातील मुख्य खरीप पिके सोयाबीन व तूर पिकाचे अधिक उत्पादन कसे काढावे याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी मांडले व उपस्थित शेतकऱ्यांचे आभार श्री कैलास एसगे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी 100 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती होती .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होट्टल शेतकरी उत्पादक कंपनी होट्टल व बळीवंश ऍग्रो प्रोडूसर कंपनी कावळगाव यांचे सहकार्य लाभले.
#farmer #kvk #Nanded #sagroli
#NaturalFarming #AmritMahotsav #InnovativeAgriculture #KBPH #KisanBhagidari