गंगामा मंडळ या पोषण बागेची आखणी डॉ. माधुरी रेवणवार यांनी महिलांना प्रत्यक्ष करून दाखविली
August 12, 2021
किड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतीचा एकात्मिक वापर करून पर्यावरणाला अनुकूल असे किड व्यवस्थापन करावे…… डॉ. कृष्णा अंभुरे
October 7, 2021
सगरोळीच्या तेजस्विनी बनल्या आत्मनिर्भर : लॉकडाऊन काळात किरकोळ कामापासून सुरु झालेल्या प्रवासाचा लाखाचा पल्ला पार
संस्थेकडून पाच वर्षापूर्वी महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण घेण्यात आले. त्यातून किरकोळ कामे करीत काही महिला एकत्र आल्या. कापूस वेचणी कोट, शालेय गणवेश आदी वस्तू तयार करणे याहेतूने पुढे प्रगती टेक्सटाइलची स्थापना करण्यात आली.
मागील कोरोना काळ मात्र सर्वांसाठी अतिशय खडतर गेला. ग्रामीण भागातील व्यक्तींची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली होती. संस्थेतील शिवणकाम कोर्स पूर्ण झालेल्या काही महिला एकत्र आल्या आणि हाताला काम मिळावे म्हणून अत्यल्प दरात कापडी मास्क तयार करू लागले.
संस्थेच्या पाठबळावरच कृषी विज्ञान केंद्र विभागातील गृहविज्ञानशास्त्र प्रमुख डॉ. माधुरी रेवणवार आणि प्रकल्प समन्वयिका सौ. श्रद्धा देशमुख यांनी या विषयात लक्ष घालून महिला आर्थिक विकास महामंडळ व मानव विकास मिशन यांचेशी संपर्क साधत नवीन ३० मशीन व इतर साहित्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. नांदेड येथील मा. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या सहकार्याने जून २०२१ अखेर एक मोठा विभाग सुरु झाला. अवघ्या दोन महिन्यात त्याला एका लघु उद्योगाचे रूप आले आहे.
मास्क, सोयाबीन काढणी ग्लोज, कापुस वेचणी कोट आदी शेतीविषयक सुरक्षा आवरणे मागणीनुसार तयार करून देणे यासाठी आज अंदाजे २५-३० महिला दिवसातील ८-१० तास कष्ट घेत आहेत. यातून भांडवल वजा जाता प्रत्येक सदस्यास आज कामानुसार ८०००-१०००० मासिक उत्पन्न मिळत आहे.
नुकतीच तेजस्विनी गारमेंट सेंटरच्या महिला सदस्यांनी अहोरात्र मेहनत करून १८०० कापुस वेचणी कोटची पहिली ऑर्डर यशस्वीरीत्या पूर्ण केली. येत्या ३-४ दिवसात दुसऱ्या २००० कोटची ऑर्डर पूर्ण होईल. यापुढेही शालेय गणवेश, पिशवी, ड्रेस,कोट आदी ऑर्डर आल्यामुळे या महिलांना कायमचे हाताला काम आणि कामचे योग्य दाम मिळत असल्याने पहिली ऑर्डर पाठविताना सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद कष्ट विसरायला लावणारा नवीन कामास बळ देणारा ठरला.
सर्व तेजस्विनींचे अभिनंदन…. #atmnirbharbharat #womenempowerment2021 #AtmaNirbhar #Rural 
 
 

Comments are closed.