Central Research Institute for Dry Land Agriculture(CRIDA) Hydrabad Team – visited
March 24, 2022
आर्थिक व्यवस्थापनाचे मापदंड तसेच समुदाय आधारित संस्थाचे आर्थिक कृति आराखडा या विषयावर सविस्तर असे प्रशिक्षण
March 24, 2022

Gender equality today for sustainable tomorrow.. शाश्वत भविष्यासाठी स्त्री-पुरुष समानता..

‘भविष्य शाश्वत आणि सुरक्षित करायचे असेल तर स्त्री पुरुष समानता हवी” अशी थीम यंदाच्या म्हणजेच 2022 च्या जागतिक महिला दिनाची आहे. याच थीम वर आधारित संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र आणि एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रम यांच्या संयुक्त विदयमाने कटकळंबा ता. कंधार येथे दि. 5/3/2022 रोजी महिला मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात स्त्री पुरुष समानतेचे महत्व या विषयावर सौ. मेघाली खिरपावार यांनी माहिती सांगितली . तसेच कंधार तालुक्यातील उमेद अभियान व्यवस्थापक श्री. चीलगर सर यांनी बचत गट सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात केवळ व्याख्यानातूनच नाही तर बेटा बेटी एक समान ह्या नातिकेतून आणि नारी शक्ती या अतिशय सुंदर आणि प्रभावी गाण्यातून छत्रपती शिवाजी ज्युनिअर बेसिक स्कूल, सागरोली येथील सर्व महिला शिक्षिकांना समाजीक संदेश उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचा प्रभाव खुप छान पहिला मिळाला, गावातील लोकांनी पुन्हा एकदा हाच कार्यक्रम घेण्यात यावा अशी मागणी केली. #Gender #equalityforall #sustainable #Tomorrow #शाश्व #भविष्यासाठी

Comments are closed.