आजची युवा पिढी अनेक आव्हानांना सामोरे जात आपल्या प्रयोगशीलतेने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कृषिक्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. अशा कर्तुत्ववान शेतकर्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भारतातील अग्रगण्य कृषि विज्ञान केंद्रापैकी एक असलेल्या, संस्कृति संवर्धन मंडळ द्वारा संचालित कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी ता. बिलोली, जिल्हा नांदेड द्वारे आयोजित कृषिवेद या भव्य कृषिप्रदर्शनाच्या व्यासपीठावरून कृषि क्षेत्रातील तज्ञांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याकरिता खालील श्रेणीमध्ये नामांकन मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा:
पुरस्काराचे स्वरूप:
प्रत्येकी ११००० रुपये रोख व सन्मानपत्र
फक्त मराठवाडा विभागातील पुरुष व महिला शेतकरी, कृषि क्षेत्रातील व्यावसायिक, युवा कृषि उद्योजक, कृषि स्टार्टअप, कृषिविषयक सर्व व्यवसाय, शेतकरी उत्पादक कंपनी, फळ प्रक्रिया उद्योग, कृषि व कृषि उद्योग क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती.
ईमेल – [email protected] किंवा व्हॉट्सॲप – 8830750398, 8087697117
महत्वाची सूचना: प्रस्ताव पाठवताना अर्धवट पाठवलेले प्रस्ताव ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रस्तावासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवावीत त्याशिवाय प्रस्तावाचा विचार होणार नाही. अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला पुरस्कार वितरणाच्या आधी भ्रमणध्वनीद्वारे कळविण्यात येईल. अंतिम निवडीचे सर्व अधिकार निवड समितीला राहतील.
