बेळकोणी येथे ड्रोन च्या साह्याने सोयाबीन वर फवारणी…
October 10, 2023
कृषि तंत्रज्ञान महोत्सव – 7, 8, 9 फेब्रुवारी 2024
January 25, 2024

बेटमोगरा येथे ड्रोन च्या साह्याने सोयाबीन वर फवारणी..

संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शास्त्रज्ञ डॉ. प्रियंका खोले आणि सिद्ध दयाळ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेटमोगरा यांच्या सहकार्याने नायगाव परिसरात आधुनिक तंत्रज्ञानवर प्रशिक्षण तसेच ड्रोन चे सोयाबिन फावरणी प्रातेक्षिक दाखवण्यात आले. कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. प्रियंका खोले यांनी शेतकऱ्याना नवनवीन तंत्रज्ञानाबद्दल तसेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले व त्याचबरोबर drone बद्दल सखोल आणि महत्त्वाची माहिती उपस्थीत शेतकऱ्यां देण्यात आली. त्याच सोबत पुणे येथून आलेले CS innovations ड्रोन कंपनी चे इंजिनिअर ने सोयाबिन वर drone ने फवारणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी नंतर शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून ड्रोन तंत्रज्ञानाबद्धल सविस्तर माहिती घेतली. या चर्चे दरम्यान ड्रोन तंत्रज्ञानाबद्धल शेतकऱ्यांच्या मनात असलेले समज गैरसमज दूर झाले आणि ड्रोन फवारणी बद्धल शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला नवीन तंत्रज्ञानाबद्धल समाधान व्यक्त केले. मागील दशकापासून कृषि विज्ञान केंद्र सगरोळी च्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होताना दिसत आहे आणि नक्कीच या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी समृध्द होतील हा एकवेम उद्देश कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चा आहे. #drone #technology #tech #agriculture #farmer #ICAR #farming #rural #youth #skills #cskrishi #csi #krishi @PMO India Nitin Gadkari Narendra Modi CerebroSpark Innovations LLP Narendra Singh Tomar Icaratari Pune
 

Comments are closed.