आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच अंतर्गत आज दि. 9 मे 2023 रोजी गंगनबीड ता. नायगाव येथे तृणधान्यचे आहारातील महत्त्व आणि ज्वारी पिठाची साठवण क्षमता वाढवणे या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित महिलांना डॉ. माधुरी रेवनवार यांनी विविध तृणधान्यांचे आहारातील महत्त्व सांगितले. तसेच ज्वारीचे पीठ जास्त काळ टिकून राहत नाही. पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ झाल्यास त्याचा कस जातो तसेच त्यात किडे होतात. हे टाळण्यासाठी व ज्वारी पिठाची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. #IYM2023 #nutritious #YearofMillets #kvksagroli #nanded #maharashtra #पोषक #तृणधान्य #climatechange #Smart #agriculture #women #empowerment #training