संस्कृति संवर्धन मंडळ,सगरोळी आणि शिव पाणलोट विकास समिती, होट्टल यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे होट्टल, ता. देगलूर येथे उन्हाळी भुईमूग लागवड आणि उत्पादनवाढ तंत्रज्ञान मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. कपिल इंगळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. भुईमूग हे सर्वांत जुने आणि महत्त्वाचे तेलबिया पीक असून, प्रामुख्याने उन्हाळी हंगामात घेतले जाते. मात्र, योग्य नियोजनाअभावी उत्पादन कमी मिळते, त्यामुळे अनेक शेतकरी या पिकाची लागवड टाळतात. योग्य नियोजन आणि घुगे पॅटर्न अवलंब केल्यास उत्पादन वाढून आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी भुईमूग लागवडीचा घुगे पॅटर्न आवश्यक घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये: