एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण
संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कीड व रोग व्यवस्थापन विषयावर मौजे किनाळा ता. बिलोली जि. नांदेड येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील पीक संरक्षण तज्ञ डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना कीड रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती देताना हवामानाच्या बदलानुसार होणारा कीड व रोगांचा प्रादुर्भाव याबद्दल मार्गदर्शन केले. एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना आंतरपीक, सापळा पीक, विविध चिकटसापळे, पक्षी थांबे, विविध जैविक निविष्ठा याबद्दल मार्गदर्शन केले तसेच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी किडींची आर्थिक नुकसान पातळी जाणून मगच फवारणी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला किनाळा, बडूर, बिजूर या गावातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
#agriculture #farmers #farming #insect #diseasemanagement #trainingprogramme