संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी द्वारे मौजे हिप्परगा ता. बिलोली जि. नांदेड येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना प्रायोजित उडीद पिकातील एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयावर समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिक राबविण्यात आले होते आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांना जून महिन्यात बियाणे तसेच बीज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या निविष्ठा वाटप करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी आवश्यक निविष्ठा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये वाटप करण्यात आले होते त्या अनुषंगाने सदर प्रात्यक्षिकाचा शेती दिन साजरा करण्यात आला. सध्या शेतकऱ्यांचे पिक काढणीच्या अवस्थेत आहे आणि शेतकऱ्यांना पारंपारिक उडदापेक्षा या उडदाची प्रत चांगली आहे असे वाटले, तसेच पारंपारिक उडदापेक्षा जास्त उत्पादन येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. #cropprotection #agriculture #crop #Integrated #management #greengram #farming #farm #farmer #National #Food #Security #Scheme #kvk #sagroli #nanded