संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी मौजे लिंगी ता. औराद जि. बिदर येथे खरीप पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. बिदर जिल्ह्यातील लिंगी हे गाव महाराष्ट्राच्या सीमेलगत असल्याने शेतकऱ्यांना कन्नड भाषेचा अडथळा येत होता ही अडचण लक्षात घेऊन वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे यांनी कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी यांच्याकडे प्रशिक्षण देण्याबाबत विनंती केली आणि त्या अनुषंगाने एक दिवशी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. डॉ. कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना खरीप पिकातील विविध कीड व रोगांची ओळख आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांसह प्रक्षेत्र भेट देऊन प्रत्यक्षात कीड व रोगांची पाहणी केली आणि सद्यस्थितीत करावयाच्या उपायोजना याबद्दल मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. #farming #climate #Smart #agriculture #climatechange #kvksagroli #nanded #best #farmers