चला जनुया नदीला अभियाना अंतर्गत कासाळगांगा नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम, जिल्हा परिषद व उमेद अभियान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 व 13 सप्टेंबर 2023 रोजी महुद, जि. सोलापूर येथे मीलेट महोत्सव व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. मागिल महिन्यात येथील 30 महिलांचा एक गट संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे तीन दिवसीय मीलेट प्रक्रिया प्रशिक्षण घेण्यासाठी आला. याचाच पुढील भाग व उद्योग उभारणीच्या विवीध गरजा ओळखून सदरील प्रशिक्षण आयोजीत केले गेले. यामध्ये डॉ. माधुरी रेवणवार, श्री व्यंकट शिंदे, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, स्टँडरडायझेशन, नुट्रीशन अनालीसीस, पदार्थांचे दर ठरविणे, पॅकेजिंग, मशिनरी गरज अश्या विवीध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ सुमंत पांडे यांनी मार्केटिंग लिंकेज व गट बांधणी, जबाबदारी ओळख अश्या विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये उमेद अभियान सोलापूर येथील सर्व अधिकारी उपस्थिती होती व ग्रापंचायत महुद् व तेथील शिवाजी कॉलेज यांनी मोलाचे सहकार्य लाभले. अतिशय उत्साही महिला वर्ग होता. तसेच आपल्या ट्रेनिंग मुळे मिलेट प्रक्रिया उद्योगाची सुरुवातही झाली. पुढील महिन्यात प्रॉडक्ट लॉन्च होणार आहेत. #agriculture #trainingprogramme #kvk #sagroli #nanded #solapur #IYM2023 #YearOfMillets #चला_जनुया_नदीला #अभियाना #InternationalYearOfMillets2023