परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम..
कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे “परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम काटकळंब ता. कंधार या गावातील १७ महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यक्रमात तज्ञांनी कुक्कुटपक्ष्यांचे पोषण, योग्य आहाराचे व्यवस्थापन, आणि आहारातील पोषक तत्त्वांची महत्त्व सांगितले. तसेच, कुक्कुट पक्ष्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व, रोगनियंत्रण, आणि स्वच्छतेचे नियम यावरही विशेष भर दिला. यासोबत अंडी उबावणी करताना चांगले जिवंत अंडे आणि फलित नसलेले अंडे ओळखण्याची सोपी पद्धत बाबत माहिती दिली. प्रशिक्षणात पक्ष्यांची निवासव्यवस्था कशी असावी, त्यांची सुरक्षितता आणि वातावरणाचे नियोजन कसे करावे, यासह विविध तांत्रिक माहिती देण्यात आली. महिला शेतकऱ्यांना त्यांच्या परसबागेतील कुक्कुट पालन व्यवसायात अधिक उत्पादनक्षम आणि आरोग्यदायी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व साधने यांचा उपयोग कसा करावा, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. #कुक्कुटपालन???? #महिलाशेतकरी #कंधार #प्रशिक्षणकार्यक्रम #आत्मनिर्भरभारत #महिलासशक्तीकरण #ग्रामीणविकास #स्वयंपूर्णभारत