परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम..
August 27, 2024
कागदी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन
April 4, 2025

फळ पिके: शाश्वत पीक विविधीकरणाची गुरुकिल्ली..
पीक वैविध्य साधण्यासाठी फळ पिके अत्यावश्यक आहेत, ज्यामुळे शेती आणि पर्यावरणाला अनेक फायदे मिळतात. विविध प्रकारच्या फळपिकांचे शेती पद्धतीमध्ये एकत्रीकरण करून, शेतकरी एकाच पिकावरील त्यांचे अवलंबित्व कमी करू शकतात, ज्यामुळे बाजारातील किमतीची चढ-उतार, आणि कीड व रोगांचा प्रसार कमी प्रमाणात होतो. हि पद्धत वर्षभर उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत निर्माण करते.हे लक्षात घेऊन सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्रातर्फे केदारवडगाव येथे नाबार्ड डब्ल्यूडीएफ सीसीए प्रकल्पाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान डॉ.संतोष चव्हाण यांनी शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी फळपिकांसह पीक वैविध्यता याविषयी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या भागामध्ये येणर्या आंबा, लिंबू, सीताफळ आणि जांभूळ या फळपिकांची लागवड खर्च, उत्पन्न आणि बाजार व्यवस्थापन बद्दल माहिती दिली. तसेच श्री गंगाधर कागुलवार प्रकल्प व्यवस्थापक यांनी पाणी ताळेबंद आराखडा तयार करणे या बद्दल सविस्तर माहिती दिली. #शाश्वतशेती #फळपिके #पीकवैविध्य #नाबार्ड #सगरोळी #कृषी #महाराष्ट्र #कृषिविज्ञानकेंद्र #KVKSagroli #पर्यावरण

Comments are closed.