ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेळीपालन…
August 27, 2024
परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम..
August 27, 2024

बाजारपेठेतील मागणीनुसार भाजीपाला लागवड तंत्रज्ञान: अधिक उत्पन्न, कमी खर्च
संस्कृति संवर्धन मंडळ कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी आणि दिलासा फौंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या “व्यवसाईक भाजीपाला लागवड तंत्रज्ञान” या विषयावर एक दिवसीय प्रक्षिक्षण घेण्यात आले. डॉ. संतोष चव्हाण यांनी भाजीपाला लागवडीच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंवर प्रकाश टाकला. त्यांनी बाजारपेठेतील मागणीनुसार पिके निवडणे, विविध प्रकारचे भाजीपाले घेऊन पिकांची विविधता वाढवणे, उच्च उत्पादन देणारे व कीडरोगांना प्रतिरोधक वाण निवडणे, जैविक पद्धतींचा वापर करून खर्च कमी करणे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन यासारख्या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणातून आपल्याला भाजीपाला लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाचे योग्य संयोजन कसे करावे हे सांगितले.सदरील कार्यक्रमास एकूण ४० शेतकरी उपस्थित होते. #भाजीपाला_ #लागवड #जैविकशेती_काळाची_गरज???? #कृषीविज्ञानकेंद्र #सगरोळी #दिलासाफाउंडेशन #Agriculture #Farming #VegetableCultivation #OrganicFarming #Farmers #YieldImprovement #MarketDemand #cropdiversity

Comments are closed.