वैज्ञानिक सल्लागार समितीचे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे यशस्वी आयोजन
August 27, 2024
समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके-उडीद शेतकऱ्यांना पीक संरक्षण प्रशिक्षण व निविष्ठा पुरवठा
August 27, 2024

युवक शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रम….
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, न्यू हॉलंड आणि बीसीआरसी प्रकल्प यांच्या सहकार्याने तीन दिवसीय कौशल्य विकास शेती यांत्रिकीकरण प्रशिक्षण उद्यमिता लर्निंग सेंटर कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न. कौशल्य विकास शेती यांत्रिकीकरण याविषयी प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे घेण्यात आले या प्रशिक्षण मध्ये वनाम कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी यांनी प्रशिक्षणार्थी सोबत गुगल मीट च्या माध्यमातुन चर्चा केली. तसेच डॉ. उदय घोडके, नोडल ऑफिसर आणि डॉ. स्मिता सोलंकी, शेती यांत्रिकीकरण विभाग प्रमुख, वनाम कृषि विद्यापीठ, परभणी यांनी आभासी मार्गदर्शन केले. न्यू हॉलंड कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरबद्दल सखोल माहिती दिली. तसेच, श्री. सर्जेराव ढवळे, श्री. व्यंकट शिंदे आणि डॉ. प्रियंका खोले यांनी प्रशिक्षणार्थींना शेती यांत्रिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, CHC, ट्रॅक्टर आणि मशिनरीची काळजी आणि दुरुस्ती या विषयांवर मार्गदर्शन केले. यासोबतच, विविध मशिनरीचे प्रदर्शनही दाखवण्यात आले. #शेतीयांत्रिकीकरणप्रशिक्षण #कौशल्यविकासकार्यक्रम #युवकशेतकरीसक्षमीकरण #शेतीउत्पादनवाढ #आधुनिकशेती #परंपरागतशेती #agriculture #agritech #agriculturetechnology #युवकशेतकरी #शेतीयांत्रिकीकरण #कृषीप्रशिक्षण #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #बीसीआरसी #न्यूहॉलंड #ट्रॅक्टर #मशिनरी

Comments are closed.