लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन…
कागदी लिंबू पिकला एप्रिल – मे महिन्यात जास्त मागणी व बाजार दर असतात व त्या करीत लिंबू पिकला सप्टेबर महिन्यात तान देणे गरजेचे असते परंतु या काळात पाऊस जास्त असल्यामुळे ताण शक्य नसल्यामुळे पिकला संजीवके (लिहोसीन ) वापरून ताण दिल्यामुळे फलधारणा जास्त होते व उत्पन्न वाढते. नागठाणा ता उमरी येथे कागदी लिंबू या फळ पिकाचे अंदाजे ५० हे क्षेत्र असल्यामुळे नागठाणा ता उमरी येथे संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत डॉ संतोष चव्हाण यांनी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन या विषयावर प्रथम प्रथम दर्शनीय प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच सदरील शेतकर्यांना लिहोसीन वाटप करण्यात आले आणि बहार व्यवस्थापन करण्याकरीत झाडांना ताण देणे, खत व्यवस्थापन या बद्दल सविस्तर माहिती दिली.
#agriculture #AzadiKaAmritMahotsav #lemon #lemon #harvesttime #fruits #farmers #citrus #horticulture #icar #लिंबू