सोयाबिन पिकातील पिवळ्या मोझॅक व्यवस्थापनावर निदान भेट आणि प्रशिक्षण.
सध्यपरिस्थितीत सोयाबिन पिकावर पिवळा मोझॅक ही एक गंभीर समस्या आहे आणि बहुतेक शेतात त्याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उमरी तालुक्यातील काही गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी उमरी व केव्हीके सगरोळी यांनी संयुक्तपणे प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उमरी तालुक्यातील बीजेगाव व बोळसा या गावांमध्ये सोयाबेनच्या मोझॅक व्यवस्थापनावर प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले होते. संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र तज्ञ प्रा.कपिल इंगळे यांनी शेतकऱ्यांना त्याचा प्रसार टाळण्यासाठी त्याच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले विशेषत: प्रभावित झाडे उपटून टाकणे, 5% निंबोळी अर्क वापर आणि पिवळे व निळे चिकट सापळे वापर आणि पांढरी माशी आणि मावा व्यवस्थापनासाठी शिफारशीतील कीटकनाशकाचा वापर शिफारस केली .कॅम्पेनमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी किनवट श्री .रणवीर व तालुका कृषी अधिकारी उमरी श्री.मिरसे, कृषी अधिकारी सौ.जाधव व कृषी सहाय्यक पाटील व मनुर कर उपस्थित होते. #सोयाबीन #पिवळामोझॅक #शेतकरी #कृषी #वैज्ञानिक #निदान #प्रशिक्षण #उपाय #सोयाबीनपिक #पिकांचेरोग #कृषीविज्ञान