सही पोषण – देश रोशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा
October 10, 2023
सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
October 10, 2023

आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन जनजागृती व प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण

संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सगरोळी नांदेड द्वारे आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन जनजागृती व प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी आदमपूर तालुका बीलोली नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये डॉ प्रियंका खोले, विषय विशेषतज्ञ, कृषि अभियांत्रिकी विभाग आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाची गरज व त्याबद्दलचे सखोल असे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले तसेच ड्रोन प्रात्यक्षिक दाखवण्याकरिता CS इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड मधील श्री ऋषिकेश सोनवणे डायरेक्टर तसेच त्यांची सहकारी टीम ला आमंत्रित केले होते. त्या ही ड्रोन टेक्नॉलॉजी बद्दल शेतकऱ्याना मार्गदर्शन तसेच प्रतेक्षिक दाखवले. या प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी मा. सरपंच साईनाथ चिंतले अददमपुर यांचे सहकार्य लाभले. या प्रशिक्षणाला 80 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. #drone in #agriculture #agriculturalmachinery #technologies #rural #youth #skills

Comments are closed.