आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष तसेच राष्ट्रीय पोषण 2023 च्या निमित्ताने आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी बचत गटांच्या महिला तसेच अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी सही पोषण – देश रोशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा तसेच पोषक पदार्थांचे प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे केले. सदरील कार्यशाळा व प्रदर्शन कृषी विज्ञान केंद्र, वातावरण अनुकूल समाज निर्मिती तसेच महिला व बालकल्याण विभाग – बालविकास योजना , बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला गेला. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी अनेक प्रकारच्या भाज्या तसेच तृणधान्यांपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ प्रदर्शित केले. डॉ. माधुरी रेवणवार यांनी प्रास्ताविकामधून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला तसेच बिलोली तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. राजुरे यांनी महिलांना आहार व पोषणाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोकमोड यांनी महिलांच्या आरोग्यावर माहिती दिली. या कार्यशाळेसाठी बिलोली येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक श्री. आशिष डोमने उपस्थीत होते. बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री. यांनी उपस्थित बचत गटांच्या महिलांना बँक लिंकेजेस बद्दल माहिती दिली. कार्यक्रमासाठी बिलोली येथील विस्तार अधिकारी श्री देवकते व अंगणवाडी सुपरवायझर सौ. पडलवार देखील उपस्थित होत्या. आजच्या या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व महिलांना पोषक तृणधान्यांचे बास्केट (ज्यामध्ये राजगिरा, बाजरी ,ज्वारी ,राजमा यांचा समावेश आहे) दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भोएवार तर आभार प्रवीण मिनके यांनी मानले. #POSHANMaah2023 #राष्ट्रीय_पोषण_महिना #Poshanmaha2023 #पोषण_महिना #पोषण #nanded #kvksagroli #महिला_बाल_विकास #womenshealth #womeninbusiness #rural