हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल..
फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी तर थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंदवला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries