आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन जनजागृती व प्रात्यक्षिकसह प्रशिक्षण
October 10, 2023
एकात्मिक पीक व्यवस्थापन उडीद शेती दिन साजरा…
October 10, 2023

सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

केंद्र शासन पुरस्कृत आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा योजना तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना याबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत नाबार्ड बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री दिलीप दमय्यावर, तालुका कृषी अधिकारी बिलोली श्री एस एन तिडके, संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे पीक संरक्षण तज्ञ डॉक्टर कृष्णा अंभुरे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक एस जी कांबळे बिलोली गटविकास अधिकारी श्री रविराज क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते. सुरुवातीला श्री एस एन तिडके यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले. कार्यक्रमादरम्यान श्री दिलीप दमय्यावर यांनी सुरुवातीला कृषी पायाभूत सुविधा योजना बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर डॉक्टर कृष्णा अंभुरे यांनी शेतकऱ्यांना या योजनेमार्फत करण्यात येणाऱ्या विविध कृषी उद्योग जसे की जैविक प्रयोगशाळा उभारणी रेशीम उद्योग ईत्यादीबद्दल मार्गदर्शन केले तसेच सद्यस्थितीत करावयाचे पीक संरक्षण याबद्दल मार्गदर्शन केले. श्री एस जी कांबळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे कर्मचारी आणि बिलोली तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #kvk #agriculture #sagroli #nanded #atmnirbharbharat #youth

Comments are closed.